नंदलाल पाटील कापगते विद्यालयात टिळक जयंती साजरी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

 दखल न्युज भारत

 साकोली – नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे दिनांक 23 जुलै 2024 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 168 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. 

       सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती आर बी कापगते यांनी बाळ गंगाधर टिळक यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी विद्यालयाचे प्रा. के.जी.लोथे, प्राध्यापिका स्वाती गहाणे ,प्रा.वाय.बि. एम. एम. कापगते, डी एस बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

         यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापिका मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविणारच’ अशी गर्जना करून भारतीयांना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.

          राजकीय जनजागृतीसाठी गणेशोत्सव जयंती व शिवजयंती या सार्वजनिक रित्या कार्यक्रम सुरू करून ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते, असे मौलिक अध्यक्षीय विचार श्रीमती आर.बी.कापगते मॅडम यांनी व्यक्त केले.

   याप्रसंगी प्राध्यापिका स्वाती गहाणे, प्रा.के.जी. लोथे, डी.आर. देशमुख, सोनाली करा-डे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. 

   याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुद्धा गीत व भाषणे सादर केलेत, तसेच इयत्ता 10 वी व 12वी मध्ये प्रवीण प्राप्त विद्यार्थ्यांना “सकाळ वेध भविष्याचा” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. 

   कार्यक्रमाचे संचालन आर.व्ही. दिघोरे यांनी तर आभार प्रदर्शन डी.डी. तुमसरे यांनी केले. 

  कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.