युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
चंद्रभागा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली महसूल विभागाने 20 जुलै रोजी कारवाईसाठी ताब्यात घेतला होता.
ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर व ट्रॉली खल्लार पोलिसांत कोतवाल व चालक जप्त करण्यासाठी खल्लार पोलिस स्टेशनमध्ये नेत असतांना खल्लार येथिल गजानन महाराज मंदिराजवळ कोतवाल उमेश इंगळे व चालकावर अक्षय दहाट याने काठी उगारुन जिवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन पसार झाला होता.
याबाबतची तक्रार तलाठी महेश डोरले यांनी खल्लार ठाण्यात दाखल केली होती.त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी अक्षय दहाट विरुध्द कलम 132,221,303(2),309(4),352,351(2)नुसार गुन्हा दाखल केला होता.
ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन पसार झालेले आरोपी अक्षय दहाट रा चंद्रपूर व शेख अर्शद शेख हारुन रा असदपूर या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर क्र MH 27,BB 0546 अवैध वाळूसह मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई ठाणेदार राहुल जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स पो उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सिडाम, अक्षय हरणे,शरद डहाके, शेख मुज्जफर, विक्रम ठाकूर, यांनी केली.