महिला शक्ती प्रभाग संघ मुरुमगाव पन्नेमारा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा…

 भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

        धानोरा तालुक्यातील मुरूम गाव येथे दिनांक 22 जून 2024 शनिवारला महिला शक्ती प्रभाग संघ मुरूम गाव व पन्नेमारा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष सरिता मडावी अध्यक्ष महिला शक्ती प्रभाग संघ हे असून या कार्यक्रमाचे उद्घाटक अरविंद तांदूळकर सेंद्रिय शेती समन्वयक, सह उद्घाटक सौ शोभा हलामी प्रभाग समन्वयक प्रमुख मार्गदर्शक सुनंदा खोरगडे, सर्च चातगाव, प्रमुख अतिथी राजेंद्र इसासे सर्च चातगाव, गंगू इबत्तीवार ,शैला कवाडकर संतोषी जाडे, कृतिका आडे, केशव लंजे समन्वयक, राकेश उईके पशु व्यवस्थापक हे होते.

        या कार्यक्रमात 14 ग्राम संघातून अंदाजे 500 महिला सदस्य उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव लंजे यांनी केले. सुनंदा खोरगडे यांनी आरोग्य विषयावर महिलांना मार्गदर्शन केले.अरविंद तांदूळकर यांनी लखपती दीदी सेंद्रिय शेती आर्थिक व्यवहार व अभियानाचे इतर बाबीवर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

         विजया पोटावी लेखापाल, यांनी महिला शक्ती प्रभाग संघ मुरूमगाव यांची आर्थिक वर्ष 2023 24 झालेले संपूर्ण व्यवहाराचे व आणि पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन व अंदाजपत्रक यांचे वाचन वाचन केले.

       या सभेत प्रभाग संघात चांगली कामगिरी केल्याबद्दल गंगू इबत्तीवार, कृतीका आडे यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन अर्चना देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश ऊइके पशू व्यवस्थापक यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सचिन मेहर, जगदीश सहारे, व महिला शक्ती प्रभाग संघाच्या महिलांनी सहकार्य केले.