सावंगी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न… — रामदास मसराम व मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम… — १३४६ रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

देसाईगंज :- तालुक्यातील सावंगी येथे कॉंग्रेस चे नेते रामदास मसराम व मित्र परिवाराने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल १३४६ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये सावंगी गांधीनगर, आमगाव, नविन लाडज या भागात वास्तव्यात असलेले बहुतांश लोक शेतकरी प्रवर्गातील असुन सुध्दा शेतात मशागतीचे दिवस सुरु असतांना या गोरगरिब लोकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर, प्रयत्नशिल असलेले शेतकरी आंदोलनाचे प्रणेते रामदास मसराम यांनी सावंगी येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

     या शिबिरात ७४० रुग्णांची नेत्र तपासणी करुण त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. ४६६ रुग्णांची मधुमेह तपासणी करुन त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला. ह्रदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करुन १२ रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे मार्गदर्शन तसेच १५ मोतीबिंदु रुग्णांची तपासणी करुन त्यांच्या शस्त्रक्रियेची पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले.

      या प्रसंगी कॉंग्रेसचे पदाधिकारी पंकज चहांदे यांचेसह १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या आरोग्य शिबिराचे आयोजक रामदास मसराम यांचेसह माजी पं.स. सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितिन राऊत, कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष राजु रासेकर, सावंगी ग्रामपंचायत च्या सरपंचा प्रभा ढोरे, पोलीस पाटील सुधीर पेलने, उपसरपंच सुमंत मेश्राम, ग्रा. पं. सदस्य राजु कुरेशी, रजनिकांत गुरनुले, नरदेश डोंगरे, शालिनी मेश्राम, टिकाराम साहारे, मोतिराम दिवठे, मोतिराम उईके, मनोज ढोरे, आरती लहरी, प्रामुख्याने उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सागर वाढई, शैलेश येलगंधवार, गौरव शिलार, स्वप्निल मिसार, मोरेश्वर मोहुर्ले, पंकज चहांदे, दुषांत वाटगुरे, प्रमोद पत्रे, लता धांडे, जावेद शेख, संगिता तूपटे, रचना बन्सोड, अश्फाक सैय्यद, लंकेश ढोरे, ब्रम्हदास गुरनुले, भुषन ठाकरे, भरत ठाकरे, यांचेसह युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. 

      या आरोग्य शिबिराला नागपुरच्या सुप्रसिद्ध असलेल्या श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोली चे तज्ञ डॉक्टर व त्यांचे कर्मचारी देसाईगंज च्या ग्रामिण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली.