जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
दखल न्यूज भारत
चंद्रपुर:सिंदवाही
लाहान चीमुकल्यान पासून मोठ्यापर्यंत आधार कार्ड सर्वच नागरिक काढत असतो, तुम्ही आधार कार्ड काढले अन त्याच्यावर तुमचा फोटोएवजी थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापून आला तर काय?.. आहे ना गंमत. पण हे खरं आहे, होय हि घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील एका चिमुकल्यासोबत घडली. सात वर्षा पूर्वी काढलेला आधार कार्ड वरचा हा फोटो जशाचा तसाच आहे. चिमुकल्याचे नाव आहे जिगल जीवन सावसाकडे हा सिंदवाही तालुक्यातील व्हीरवा या गावी राहतो आणि आधार कार्ड वर फोटो आहे सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि याच आधार कार्डवर मुलाला शाळेत प्रवेशही मिळाला आहे.
सात वर्षापूर्वी जिगलच्या आई ने जिगलचा आधार कार्ड काढला होता त्याच्यावर मुलाचा फोटो एवजी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचा फोटो आला ही चूक तेव्हाच आई च्या लक्षात आली. मात्र अपडेट करण्याच्या चुकी मुळे सात वर्षाच्या मुलाच्या आधारावर चक्क उपमुख्यमंत्र्याच्या फोटो आला.एवढेच नाही तर त्या मुलाला शाळेत सुध्दा याच आधार कार्डवर प्रवेशही घेण्यात आला. या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान आधार कार्ड वरील नाव बदलवण्यासाठी मुलाच्या आई ने आधार केंद्रामध्ये चकरा मारणे सुरु केले आहे.
शासकीय काम आणि सहा महिने थांब ..
मुलाच्या आई ने हा फोटो बदलवण्याचा प्रयत्न केला. मात्र शासकीय काम आणि सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे आजही फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचास आहे पाच वर्षानंतर मुलाचे आधार कार्ड अपडेट करावा लागत असल्याची माहिती जिगलच्या आई ला मिळाल्यानंतर आता तीन्हे पुन्हा आधार कार्ड अपडेट साठी प्रयत्न सुरु केले आहे।