कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-महाराष्ट्र नव निमार्ण सेनाच्या पारशिवनी तालुका अध्यक्षपदी डँनी धनोर यांची नियुक्ती जिल्हा मनसे नागपुर जिला अध्यक्ष शंकरजी दुंडे यांचा अध्यक्षते खाली करण्यात आली.
पारशिवनी तालुका अध्यक्ष डॅनी धनोरे यांचे तालुका अध्यक्ष पदी निवड झाली असून ग्राम पंचायत पथरई सदस्य कुंदन राऊत यांनी पुष्गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी मनसे पक्षाचे कार्यकर्ते रोहित धनोरे,मनसर शाखा अध्यक्ष संजय टेकाम,मंगेश वाडीवे,सूरज ठाकरे,आकाश बोरीकर,शिवम ठाकरे,रोहित बघेल,पंकज इनवाते,अभिषेक कठवते,राज हुंमने,आकाश संगोडे,कुणाल चौधरी इत्यादी उपस्थित होते.