
उमेश कांबळे ता प्र भद्रावती
भद्रावती शहरातील किल्लावार्ड येथील तेजस मधुकर मालेकर याने नुकत्याच् झालेल्या नीटच्या परीक्षेत ७२० पैकी ६१५ गुण घेऊन मोठे यश प्राप्त केले असुन भद्रावती शहरासाठी अभिमानाची बाब आहे.
तेजसचे वडिल हे भद्रावती बाजारपेठ येथे भाजीपाला विक्रेते असुन आई ग्रृहिणी आहे आपल्या आर्थिक परीस्थितीवर मात करुन तेजसने हे यश प्राप्त केलेले आहे, वडिलांच्या भाजीपाला व्यवसायातसुध्दा तो पुर्ण मदत करीत होता. पुढे चालुन तेजसने मोठा डाॕक्टर होऊन जनतेची सेवा करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्याला भद्रावती नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा किल्लावार्डचे नगरसेवक प्रफुलभाऊ चटकी यांनी तेजसचे व त्यांच्या यशाचे मानकरी आई व वडिलांना शाल पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन स्वागत केले.