युवा मोर्चाने केली बाईक रॅलीच्या माध्यमातून मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामकाजाचा प्रचार व प्रसार… — शेकडो युवक बाईक रॅलीत सहभागी.

ऋषी सहारे

संपादक

कुरखेडा:-

     मोदी@9 सक्षम भारताची विकसित ९ वर्ष महाजन संपर्क अभियान अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा कुरखेडा यांच्या वतीने काल दिनांक 22 जुन 2023 गुरुवार रोजी शेकडो यूवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बाईक रॅली मध्ये सहभाग घेवून मोदी सरकारचे नऊ वर्ष हे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण करीता केलेले राज्य होय यांची जनजागृती युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध प्रभागामधून बाईक रॅलीच्या माध्यमातून मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्याचl प्रचार व प्रसार केला.

      यावेळी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली. आमदार कृष्णा गजबे यांनी बाईक रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या युवा वर्गाला मार्गदर्शन करताना म्हटले की मोदी सरकार चे शासन हे भारत देशाला सुजलाम सुफलाम करणारे शासन असून भारताला विश्वगुरू बनविण्याकरिता मोदी सरकारची पुन्हा आवश्यकता असल्यामुळे जनतेने मोदी सरकारला निवडून द्यावे असे सुद्धा आव्हान केले.

      यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे कर्तबगार जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांनी मोदी सरकारचे ९ वर्ष हे सबका साथ, सबका विकास और सबका प्रयास या भावनेतून काम करीत असलेले सरकार असून मोदी सरकारचे सेवा भावी कार्य युवकांनी घराघरात पोहोचवण्याचे कार्य करावे असे आवाहन केले.

      यावेळी बाईक रॅलीमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव भाऊ फाये, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू भाई हुसेनी, शहराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे भाजपा ज्येष्ठ नेते विलास गावंडे, नगरसेवक रामभाऊ वैध,सभापति अतुल झोडे, नगरसेवक सागर निरंकारी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, उपसरपंच भाग्यवान जनबंधू, युवा मोर्चा तालुका महामंत्री उल्हास देशमुख, प्रशांत हटवार, अक्की सांगोडे, तालुका महामंत्री तुषार कुथे, मंगेस मांडवे, राहूल, गिरडकर बंटी देवढगले, धर्मा दरवडे, जगदीश मानकर , स्वप्निल खोब्रागडे, हरीश तेलका व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

       बाईक रॅली ची सुरुवात कोकोडे पेट्रोल पंम्प कुरखेडा येथुन सुरुवात होऊन मुख्य बाजार चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन शिवाजी शाळा ते कुंभिटोला रोड श्रीराम नगर ते साई मंदिर पासून हनुमान मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी युवा मोर्चाच्या वतीने अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.