
सुधाकर दुधे
सावली प्रतिनिधी
तालुक्यातील सिरसी गावात बिबट्याने गावात शिरकाव करून दादाजी किनेकार व संजय वसाके यांच्या गोठ्यातील शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास तिन शेळ्या वर हल्ला केला.यात दोन ठार तर एक जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यातंर्गत शेळ्यांच्या मृत्यूने सदर नागरिकांचे नुकसान झाले असल्याने पंचनामा करून योग्य मोबदला देण्याची विनंती वन विभागाकडे संबंधितांनी केली आहे.
हा परिसर जंगलव्याप्त असून या गावात व आजूबाजूचा परिसरात मानवी व पशुधनावर नेहमीच वन्य प्राण्यांचे हल्ले होताना दिसून येत आहेत.याकडे वन विभागाने वन्यप्राणी गावात शिरकाव करणार नाही याकरिता उपाययोजना करण्याचे नागरिकात बोलल्या जात आहेत.
बिबट,वाघ,गावात येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवीत ठार मारत असल्याने नागरिकात कमालीची दहशत पसरली असुन बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
यादरम्यान वन विभागाचे सीरसी बिट येथील वनरक्षक मुंढे व चकपिरंजी येथील वनरक्षक विश्वास चौधरी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केले.
त्यावेळी उपस्थित शेळी मालक व गावकरी उपस्थित होते.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यानी मदतीची अपेक्षा वर्तविली आहे …..