डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली, दि. २३ : जिल्हा प्राणिक्लेष प्रतिबंधक समिती, गडचिरोली करीता अशासकीय सदस्य म्हणुन नेमणुक करण्याकरीता दिनांक 14 मार्च 2017 च्या अधिसुचनेन्वये प्राणि क्लेष प्रतिबंधक (प्राणि क्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापना व नियमन) नियम 2021 मधील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय जिल्हा प्राणि क्लेष प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्य म्हणुन नेमणुकी करण्याकरीता स्थानिक पातळीवरुन अर्ज मागविण्यात येत आहे. तरी मोठया संख्येने ईच्छुक / पात्र व्यक्तींनी जिल्हा प्राणिक्लेष प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्य म्हणुन नेमणुकी करीता अर्ज करण्याकरीता पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय गडचिरोली येथे संपर्क साधावा असे आवाहन डॉ. वि.अ. गाडगे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली यांनी केले आहे. अर्जाचा नमुना पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.