भाविक करमनकर
धानोरा प्रतीनिधी
जागतिक योग दिनाच्या औचित्य साधून आयुष विभाग ग्रामीण रुग्णालय धानोरा यांच्या वतीने योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश गजबे डॉक्टर सावसाकडे डॉक्टर सीमा गेडाम डॉक्टर मंजुषा लेपसे मॅडम इत्यादी उपस्थित होते. योग यावेळी योग प्रशिक्षक राऊत सर यांनी योग प्रात्यक्षिक व योगाचे धडे व योगाचे फायदे सांगितले डॉक्टर सीमा गेडाम यांनी मानवी जीवनातील योग प्राणायाम यांचे महत्त्व विशद केले दैनंदिन व्यस्त जीवनशैलीमध्ये कमीत कमी 30 मिनिटे दररोज योगा करावे असे मार्गदर्शन त्यांनी यावेळेस केले. या योग कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय धानोराचे सर्व अधिकारी व कर्मचारी आणि रुग्णालयातील रुग्ण उपस्थित होते.