वणी : परशुराम पोटे
मागील तीन महिन्यांपासून
कोरंबी मारेगांव, पेटुर, सुकनेगाव, नवरगाव, विरकुंड, मोहर्ली, मानकी या परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गो- धन वाघाने ठार केली आहे.
आता बोर्डा येथिल जंगलात वाघाने एका गाईवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दुपारी १२ वाजता चे सुमारास घडली आहे.
तालुक्यातील बोर्डा या गावा नजिक जंगल असल्याने या जंगलात जनावरे चराईसाठी जात असते. दि.२३ जुन रोजी सकाळी जनावरे चराईसाठी गेले होते. दरम्यान १२ वाजता चे सुमारास वाघाने एका गाईवर हल्ला चढवला, यावेळी काही जनावरे इकडे तिकडे सैरावैरा पळाल्याने काही लोकांनी धाव घेतली असता वाघाने गाईवर हल्ला केल्याचे दिसून आले. मात्र या हल्यात गाईचा मृत्यू झाला होता.
या परिसरात वाघाचा वाढता वावर हा शेतकरी शेतमजूरांसाठी चिंतेचा विषय बनला असून शेतकऱ्यांना शेतात जाण्यास भिती निर्माण झाली आहे. परिणामी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.