वणी : परशुराम पोटे

स्थानिक जत्रा रोड ते वागदरा या मुख्य रस्त्यावर गोकुळनगरमध्ये अगदी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून थाटलेले भंगारचे दुकान हटविण्याची मागणी दि.२३ जुन रोजी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याकडे करण्यात आली आहे.

 निवेदनात म्हटले आहे की, त्या दुकानातील सर्व भंगार वस्तू रस्त्याच्या दोन्ही कडेला टाकून असतात, त्यामुळे जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावलेली आहे. सोबतच गोकुळनगर येथील बहुतांश रहिवाशी दुग्ध व्यवसाय करतात, दुधाळ जनावरे रस्त्याने नेत असतांना रस्त्यावर टाकलेल्या भंगारामुळे त्यांच्या पायांना ईजा होवून बरेचदा जनावरे लंगडी होत आहे. त्यामुळे जनावरांच्या मालकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.

त्याचप्रमाणे वस्तीतील लोकांना सुध्दा रस्त्याच्या आजु बाजुला टाकलेल्या भंगारामुळे अनेकदा ईजा झालेली आहे. नुकतच नगर परिषदेने जत्रा मैदान येथील अतिक्रमण हटविले परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण केलेल्या भंगार व्यवसायिकाचे अतिक्रमण का हटविलेले नाही? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला असून अतिक्रमण करून थाटण्यात आलेले भंगारच्या दुकानाचे अतिक्रमण हटवून रहिवाश्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com