युवराज डोंगरे/खल्लार
येवदा येथील कुलदीप प्रल्हाद भालतडक याला ग्रामपंचायतीने शिपाई पदावर कायम नियुक्ती न केल्याने त्याने ग्रामप्रशासना विरोधात २० जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते त्यातच
दोन दिवसांनी आंदोलनाची कुठलीच दखल न घेतल्याने कुलदीप यांच्या आईने ग्रामपंचयातला दि.२१ ला सायंकाळी टाळे ठोकले होते . याची सर्वत्र चर्च्या होताच दि २२ तारखेला ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी कुलदीप याच्या आईला दुसऱ्या दिवशी सभा घेण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी ग्रामपंचयातचे टाळे उघडून देत प्रशासनास सहकार्य केले .
अखेर कुलदीप याच्या आंदोलनाची दखल घेत सरपंच प्रतिभा माकोडे व सचिव निरंजन गायगोले यांनी दि . २३ तारखेला विशेष सभा बोलावून कुलदीप याला शिपाई पदावर कायम करण्या संदर्भात ठराव घेऊन पुढील कारवाई करीता पंचायत समिती कडे पाठविण्यात आला . त्या बाबतचे पत्र कुलदीप यांना देऊन अखेर चवथ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली त्यानुसार कुलदीप यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. ग्रामपंचायत सदस्य आमानुल्ला पठाण यांचे हस्ते निंबूपाणी घेऊन अन्नत्याग आंदोलन यशस्वी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
या वेळी सरपंच प्रतिभा माकोडे, सचिव निरंजन गायगोले ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी , व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.