पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- भारताच्या स्वातंत्र्यास ,दिनांक 15 ऑगष्ट 2021 रोजी 75 वर्षे पुर्ण झालेले आहेत.या गौरवशाली पर्वानिमीत्य, केंद्र शासनाद्वारे “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्याने देसाईगंज नगर परिषदेद्वारा “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याकरीता विविध कार्यक्रमांचे /उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आझादी का अमृत महोत्सव /माझी वसुंधरा/स्वातंत्र्य सेनानी या विषयांवर स्थानिक सांस्कृतिक भवनात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कु. साक्षी भाऊराव शिवरकर, या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक तर तुषार दिलीप अत्रे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकविला तर कु. शितल दिवाकर मुळे ही तृतिय बक्षीसाची मानकरी ठरली.
रांगोळी स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, यांचे हस्ते तर माजी नगराध्यक्षा शालूताई दंडवते यांचे अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, दैनिक देशोन्नतीचे तालूका प्रतिनिधी पत्रकार किशोर मेश्राम यांचे प्रमुख उपस्थितीत स्थानिक सांस्कृतिक भवनात संपन्न झाले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच 5 स्पर्धकांना सुध्दा प्रोत्साहनपर रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेस नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे, नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांनी भेट देऊन स्पर्धकांचे कौतूक केले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.