अकोट प्रतिनिधी
तेल्हारा येथे औधोगिक प्रशिक्षण संस्था व नेहरू युवा केंद्र,विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळ पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ अध्यक्ष प्रदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली २१ जून २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योग दीना निमित्य औधोगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रागणात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या वेळी योग प्रशिक्षक म्हणून पतंजली योग समितीच्या पुष्पा खोडे मॅडम यांनी शरीराकरिता महत्वपूर्ण योगासने व विविध प्रकारचे व्यायामाचे महत्व सांगितले व योगा करून प्रशिक्षकाद्वारे उपस्तीत सर्वांनी योगासने केली या कार्यक्रमाची सांगता योगा प्रशिक्षक पुष्पा खोडे, आई टी आई चे प्राचार्य एस आर ठोकरे, आर एन घावट, यांचे स्वागत विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळा च्या वतीने करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तेल्हारा तालुका विक्की वाघ यांनी तर आभार प्रदर्शन शुभम राऊत यांनी मानले या वेळी औधोगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक,कर्मचारी,विध्यार्थी युवक-युवती व विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ पाथर्डी चे सदस्य उपस्तीत होते
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी औधोगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा चे सर्व शिक्षक व कर्मचारी,मंडळाचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.