सावली (सुधाकर दुधे)

 

 . २२/०६/२२ रोजी रात्रीदरम्यान सावली पो.स्टे हद्यीतून अवैध गोवंश जनावरे वाहतुक होणार आहे अशा गुप्त माहीतीवरून सावली टाउन येथे अचानक नाकाबंदी केली असता सकाळी अंदाजे ०७:३० च्या सुमारास मिळालेल्या गुप्त खबरेनुसार गडचिरोली दिशेकडून एकामागोमाग येणारे दोन ट्रक थांबवून पाहणी केली असता दोन्ही ट्रकमध्ये लहानमोठे एकूण ७८ गोवंश जनावरे वाहनाची क्षमता नसतांना अत्यंत निर्दयतेने , कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून ‘ कोंबुन बसवून ठेवलेले दिसून आले . दोन्ही ट्रकमधील मिळून ७८ गोवंश जनावरे कींमत अं ७,८०,००० रू टाटा कंपनीचे दोन ट्रक क MH 04 CU 9295 व CG24S2672 कींमत २०,००,००० रू असा एकूण २७,८०,००० रू चा माल जप्त करण्यात आला . सदरचे जप्त जनावरे ही त्यांच्या सुरक्षीतता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आले . > आरोपी क १ ) अब्दुल राजीक अब्दुल रफीक वय ३६ वर्ष ०२ ) मो.अस्लम मो . आजम वय ३४ वर्ष ३ ) रेहनुद्दीन फकरुद्दीन वय २५ वर्ष सर्व राहणार मुर्तीजापूर जि . अकोला व ट्रक क CG 24 S 2672 चा फरार चालक अशा चार आरोपीतांविरूद्ध महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम ५ ( अ ) , ( ब ) , प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११ डी , एफ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११ ९ , मोटरवाहन अधिनियम कलम ८३/१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . 1001 दि .२२ / ०६ / २२ पो.स्टे सावली 1001 सदरची कारवाई मा प्रभारी पोलीस अधिक्षक श्री माखनिकर साहेब , मा.प्रभारी अपर पोलीस अधिक्षक श्री शेखर देशमुख साहेब , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीकार्जुन इंगळे साहेब , ठाणेदार श्री आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवालदार दर्शन लाटकर , नापोका विशाल दुर्योधन , पो.का धिरज पिदुरकर चालक पुनेश्वर कुळमेथे यांनी केली .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com