छन्ना खोब्रागडे प्रतिनीधी
दिनांक २३/०६/२०२२ रोज बुधवारला पळसगाव अलर्ट ग्रुप व शेर शिवराय ग्रुप पळसगाव यांच्या वतीने १० वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मा.प्रल्हादजी नखाते समाजसेवक, सत्कारकर्ते केंद्रप्रमुख श्री.मा.एस.पी.मेश्राम सर, सरपंच श्रीमती जयश्री दडमल, उपसरपंच श्रीमती सोनी गरफडे, ग्रा.प.सदस्य श्री.चांगदेव दडमल,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमारजी गरफडे,अंगणवाडी सेविका प्रेमिला मने, इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सरस्वती महाविद्यालय पळसगाव येथील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कु.चेतना संजय ढोंगे, द्वितीय क्रमांक कु.मोनाली देवदास गोंदोळे, तृतीय क्रमांक पायल प्रभू गोंदोळे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. १२ वी प्रमाणे १० मध्येही मुलींनीच बाजी मारली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.युगांतर भोयर , कु.धनपाल वैद्य, कु. गोलूभाऊ लिंगायत, कु. गुरुदेव मोहुर्ले, कु.विशाल बनकर, कु.सुजल मोहुल्रे कु.सुषमा प्रधान,कु.नितीन सेलोकर कु.अनंतराज नखाते,कु.योगेश कांबळे, कु.अमित काळे, कु.साहिल गरफडे व इतर मित्र मंडळीचे सहकार्य लाभले.