दिलीप अहिनवे
मुंबई महानगर
‘दखल न्युज भारत ‘
मुलुंड, दि. २३ : मुलुंड ‘टी’ विभागातील मुलुंड कॅम्प शाळा संकुलात जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी (शाळा) नंदु घारे, विभाग निरीक्षक गोरखनाथ भवारी, कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर व अनिल सनेर यांनी संपुर्ण मुलुंड विभागात योगदिनाचे उत्तम नियोजन केले होते. सकाळ, नियमित व दूपार अधिवेशनात शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी वर्गाने योगा कार्यक्रमात सहभागी झाले होते.
इमारत प्रमुख तसेच मुलुंड कॅम्प इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका रेऊ साबळे, मुलुंड कॅम्प मराठी शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक मनोज पवार व माध्यमिक इंग्रजी शाळेचे वरिष्ठ शिक्षक विश्वनाथ गुहे यांनी शारीरिक शिक्षण शिक्षक यशवंत चव्हाण, दिलीप अहिनवे व सर्व शिक्षकांच्या मदतीने आपापल्या शाळांमध्ये योगदिन साजरा केला.
मुख्याध्यापिका रेऊ साबळे यांनी उपस्थितांना योगदिनाचे महत्त्व सांगितले. मनोज पवार यांनी सांगितले की, केवळ आजच योगा करायचा नाही तर दररोज योगा करायला हवा. नियमित योगा केल्याने आपले आयुष्य वाढते.
शारीरिक शिक्षण शिक्षक यशवंत चव्हाण व दिलीप अहिनवे यांनी योगासनांची उत्तम प्रात्यक्षिके दाखवली तसेच उपस्थितांकडुन ती करुन घेतली. विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.