चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा (साकोली) :-
पाथरी येथील गौतम बोरकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन बोकडां वर बिबट्याने हल्ला करून ठार केले. 20 जून चा रात्री बोरकर यांच्या बोकडांचा बिबट्याने जीव घेतल्या मूळे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वन मजुरी करणारे बोरकर यांनी बकरी पालन करण्यासाठी दोन बोकड पाळले होते. या बोकडाचे वजन सुमारे तीस किलो होते परंतु बिबट्याने हल्ला करून दोन्ही बोकडांना मारल्याने बोरकरांनी वनविभागाकडे घटनेची माहिती दिली आहे. गावात पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 50 हजार रुपये आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी बोरकर यांनी वन विभागाकडे केली आहे.