पारशिवनी :-तालुका तिल कन्हान येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संख्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( MCES ) नागपुर यांच्या वतीने उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम चा उद्धाटन सोहळा आज दिनाक २३ जुन बुधवार ला नवीन प्रशासकीय इमारत नगर परिषद कन्हान च्या सभागृहात येथे पार पाडला .

याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून नगर परिषद च्या नगराध्यक्षा सौ करुणाताई अनिलराव आष्टणकर मॅडम उपस्थित होते . तसेच नागपूर जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी सर यांना अध्यक्ष पद भुषविले .आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजक प्रशिक्षक श्री संदीप देशमुख सर ( सुरभी नागपुर ) प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित होते . प्रशिक्षण कार्यक्रमात अनु:सुचित जाती प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी. बार्टी द्ववारे निर्मित युवा गटातील सदस्य उपस्थित होते . 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामटेक तालुका समतादुत राजेश राठोड यांनी प्रास्ताविक केले . तर मौदा तालुका समतादुत ओमप्रकाश ढोके यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले : मौदा तालुका समतादुत श्री दुधन जी बगमार , कामठी तालुका समतादुत सुनिता गेडाम , पारशिवनी तालुका ची समतादुत शुभांगी ताई टिंगणे,सावनेर तालुका समतादूत सौ. वंदना गोडबोले , यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय अधीक्षक सुशांत नरहरी , न गर परिषद पाणी पुरवठा अधिकारी फिरोज बिसेन , नगर परिषद स्थापत्त अभियंता नामदेव माने , प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते .

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पारशिवनी तालुका समतादुत शुभांगीताई टिंगणे यांनी मानले .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com