चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा(लाखनी) :- श्री. सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय, केसलवाडा/वाघ येथे दिनांक २१-०६-२०२२ रोजी ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. आझादी चा ७५ वा अमृत महोत्सव प्रसंगी महाविद्यालयात योग दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. भूषण वंजारी सर तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. प्रणाली सावरकर, योग प्रशिक्षक लाखनी, व सोशल मीडिया प्रभारी भंडारा व प्रा. जानराव बहादुरे होते.
कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सौ. सावरकर मॅडम ह्यांनी योग अभ्यासाचे विविध आसन विद्यार्थ्यांना शिकवले, संगीत आणि योग यांचा संयोग साधून आपण स्वतःला कसे निरोगी ठेऊ शकतो यावर मार्गदर्शन करून योगासने सुद्धा विद्यार्थांना शिकविले, तसेच योग व प्राणायाम काय आहे व त्याचे दैनंदिन जीवनात काय महत्व आहे, तसेच विद्यार्थीनीना योगाचे त्यांच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करून निरोगी राहता येईल याचे सुद्धा धडे व सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच आपले दैनंदिन जीवनक्रम, आहार इत्यादी कसे असावे हे उपस्थितांना त्यांनी उत्तमरीत्या पटऊन दिले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ. भूपाल हातझाडे सर ह्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अंकित खेडीकर सह कार्यक्रम अधिकारी, रा. से. यो. विभाग तसेच प्रा. तरुण कुंभरे, प्रा. राधेश्याम हातझाडे, प्रा. नूपुर असाटी सर, प्रा. अतुल टेंबेकर, प्राध्यापक प्रियंका रामटेके मॅडम प्राध्यापक चेतना वणवे मॅडम, संतोशजी भोयर, प्रशांतजी मेश्राम, सौ वाघाडे ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कु. स्नेहल उके मॅडम ह्यांनी केले. कार्यक्रमाचे अंती सौ. सावरकर मॅडम यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले व विद्यार्थांना अल्पपोहार वितरीत करण्यात आले.