खेडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरात एकूण 162 लाभार्थ्यांनी घेतला लाभ.  — 143 लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील खेडी येथील ग्रामपंचायतीमध्ये “आपला आमदारकी सेवा अभियान” अंतर्गत आमदार वैद्यकीय व अपंग सहाय्यता कक्षातर्फे मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

       येथील खेडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शिबिरात साई व्हिजन केअर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

         या शिबिरात एकूण 162 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.ज्यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी 19 चष्मे व 143 लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

           यावेळी शिबिराच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत खेडीच्या उपसरपंच कु.संगीताताई देवराव इंगळे, प्रमोदजी गजभिये, शकुंतलाताई रंगराव ठाकरे, संगिताताई मेश्राम, पुष्पाताई वानखेडे, श्री कृष्णा दौलतराव काळे, स्वप्नील विष्णुजी ठसे, सुप्रसिद्ध चतुर्थी, विष्णूजी ठसेकर, दिवंगत रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. श्रीरामे, देवराव इंगळे यांच्यासह जितेंद्र वैद्य, खुशाल ठाकरे, राहुल कोचे, प्रशांत काळे, सतीश ठाकरे, अमोल नागपुरे, गजानन काळे, सुमित कामडे, निखिल कडू, खेडी खोपडी गावातील सर्व गावातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.