अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
वडधा:- आरमोरी तालुक्याच्या वडधा येथील किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100% टक्के लागला. परीक्षा केंद्रातून व शाळेतून प्रथम क्रमांक कविता नारायण उरकुडे 79% ,द्वितीय अनुश्री अविनाश हुलके 78.33% , तृतीय क्रमांक काजल हरीश बानबले हिने 74.33% गुण पटकाविले.
प्राविण्य श्रेणीत 2 तर प्रथम श्रेणीत 27 तर द्वितीय श्रेणीत 25 आणि तृतीय श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मदन मेश्राम, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश खेवले, सचिव प्रशांत मेश्राम , सदस्य तथा प्राचार्य एल. बी. भोयर , पर्यवेक्षक आर. एम. नैताम, प्रा. सी.बी. मुल्लेवार, प्रा.पी.आर.खेवले , प्रा. डी.जी. बोरकर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात विद्यालयाचा निकाल चांगला लागत आहे यासाठी शिक्षकांची मेहनत आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात असल्यामुळे त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळते.