रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान द्वारे तथागत भगवान गौतम बुध्दांची जयंती साजरी..

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

 

कन्हान : – वैशाख बुद्ध पौर्णिमा व विश्वशांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्दांची जयंती रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान द्वारे विवध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली. 

            गुरूवार (दि.२३) मे २०२४ ला वैशाख बुद्ध पौर्णिमा व विश्वशांतीचा संदेश देणारे अग्रदूत,तथागत गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती निमित्य रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान द्वारे भव्य माल्यार्पण कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली.

      कन्हान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध व चक्रवर्ती राजा सम्राट अशोक,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले आणि त्रिशरण ग्रहण करून मानवंदना देण्यात आली.

       याप्रसंगी भदंत आर्य के. सी.एस.लामा महाथेरो,रिपब्लिकन सांस्कृतिक संघ अध्यक्ष चंद्रशेखर भीमटे,कन्हान पो. स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले,चेतन मेश्राम,मनोज गोंडाने,रोहित मानवटकर,कैलास बोरकर,धनंजय कापसिकर,अभिजित चांदुळकर,पंकज रामटेके,विक्रांत कोंडपनेनी,अखिलेश मेश्राम,विनोद बावनगडे,डॉ. प्रदीप राणे,महेंद्र चव्हान,आनंद चव्हान,संजय गजभिये,रविंद्र दुपारे,नितीन मेश्राम,शैलेश दिवे,अश्वमेघ पाटील,सुमेध नितनवरे,महेश धोंगडे,संदिप शेंडे,पोलिस कर्मचारी अनिल यादव,निखिल मिश्रा सह संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ता,तसेच बुद्ध अनुयायी यांनी त्रिशरण ग्रहण करून तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक,विश्वभूषण युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.