बौद्ध पोर्णिमा निमीत्य डॉ.आंबेडकर चौकात विविध कार्यक्रम..

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा

           गडचिरोली

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कूरखेडा येथे आज दि.२३ मे रोजी बौद्ध पोर्णिमा निमीत्य बूद्ध वंदना,खिरवाटप,पंचरंगी ध्वजारोहणासहित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          यावेळी भगवान गौतम बूद्ध यांचा पूतळ्यासमोर माजी जि.प.सदस्य अशोक इंदूरकर यांचा हस्ते द्विप प्रज्वलन करण्यात आले तर नगरसेवक अॅड उमेश वालदे व नगरसेवीका हेमलता नंदेश्वर यांचा हस्ते भगवान गौतम बूद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. 

        यावेळी चौकात पंचरंगी धार्मिक ध्वजारोहण ज्येष्ठ समाजसेविका नलीनी माने,ललीता सहारे व शारदा सांगोळे यांचा हस्ते करण्यात आला. 

       कार्यक्रमाच्यि यशस्वीते करीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सदस्य हिरा वालदे,विनोद खोबरागड़े,जितेन्द्र वालदे,राहूल खोबरागड़े,रोहीत ढवळे,रमेश नंदेश्वर,स्वप्निल खोब्रागडे,नामदेव राऊत,रवि सहारे,कीशोर सरदारे, नितेश खोबरागड़े,सेवानिवृत्त शिक्षक अशोक बोरकर,मोहन बोदेले,मिलींद सहारे,प्रमोद खोबरागड़े, रमेश सांगोळे तसेच बौद्ध समाज बांधवानी सहकार्य केले.