कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – कामठी येथे बौद्ध वाचनालय कुंभारे काॅलोनी परिसरात बौद्ध इतिहास आणि संस्कृती संशोधन संस्था संचालित संग्राहक दिलीप वानखेडे स्मृती नागार्जुन संग्रहालयच्या विस्तारित नवनिर्मित ईमारतीचे लोकार्पण २३ मे रोजी भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या औचित्यावर करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष व विश्वस्त परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दिक्षाभुमी नागपुरचे भदंत नाग दिपंकर महास्थविर,भदंत प्रज्ञाज्योती महास्थविर,सचिव बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार,भदंत ज्ञानबोधी महास्थविर सचिव आलोका ट्रस्ट आलोका संघाराम महाविहार,डॉ. भदंत सीलवंस महास्थवीर सचिव बोधिमग्गो सेवा संस्था बोधिमग्गो महाविहार यांचा मार्गदर्शनात मातोश्री अनुसयाबाई लक्ष्मणराव वानखेडे यांचे हस्ते इमारतीचे लोकार्पण थाटात पार पडले.
बोधी वाचनालय पटांगणात नागार्जुन संग्रहालय द्वारे दान दिलेल्या व थायलंड येथून आणलेल्या तथागत बुद्ध मुर्ती स्थापित करण्या करिता सुसज्जित चबुतरा बांधकामचे भुमी पूजन मान्यवरचे हस्ते करण्यात आले.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्मृतीशेष दिलीप वानखेडे यांनी काटेरी संघर्षातून अविरतपणे निस्वार्थी व तत्पर राहून आपल्या श्रमसाफल्यातून हजारो विविध मुद्रेतील लहानमोठ्या विविध धातुच्या हजारो बुद्ध मुर्त्या,ऐतिहासिक धरोहर वस्तु ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध मुद्रेतील फोटो,वापरातील वस्तु,हजारो क्वाईन,लिम्का, बुक ऑफ वल्ड मध्ये नोंद असलेले अविस्मरणीय ऐतिहासिक धरोहर संग्रहित केले.
उपरोक्त संग्रहालयास भेट देऊन अवलोकन करण्याकरीता पुणे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथील संग्रहालय व कुंभारे कामगार कॉलोनी बोधी वाचनालय परिसर ड्रैगन पॅलेस मागे न्यू कामठी येथे यावे असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगरसेवक प्रतिक पडोळे,स्वर्णलता गजभिये,गौतम माटे,सुधाताई महिले डांगे,सुजाता संघरंक्षीत पिल्लेवान,सुबोध नागदेवे, अॅड.जीजाबाई वाहणे,प्रदीप फुलझले,नामदेवराव पक्खिडे, एस.एस.सहारे,वसुंधराताई भोसेकर,अशोक थुल,अशोक वानखेडे,प्रमोद टेंभुर्णे,शुध्दोधन धनिराम पाटील,चंदु पाटील,ओमप्रकाश टेंभुर्णे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कल्पना वानखेडे,संचालन कुलदीप वानखेडे व आभार प्रदर्शन हर्षवर्धन वानखेडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रकाश कुर्वे,अनिल बेदले,अविनाश वानखेडे,अशोक पाटिल,नितिन वंजारी,निखिल भोसेकर,धम्मदीप वंजारी,महेंद्र वंजारी,संजु वानखेडे,प्रीती पाटील,प्रियंका वानखेडे सह आदि नागरिकांनी सहकार्य केले.