लक्ष्मी नरसिंह देवस्थान श्रींच्या पादुका पालखीत ठेवून छबिना वाद्य व फटाक्यांच्या आवाजात ग्राम प्रदक्षिण घेण्यात आली.

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          लक्ष्मी नरसिंहचा नवरात्र उत्सव हा सालाबाद प्रमाणे सोमवार दिनांक 13/5/2024 पासून ते गुरुवार दिनांक 23 मे 2024 पर्यंत घेण्यात आलेला आहे. 

        नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंहाचा नरसिंह जयंती नवरात्र उत्सव हा 11 दिवस उत्सव सुरू आसून दररोज प्रत्येक दिवशी सहा ते साडेसहा वाजता सनई चौघडा, सकाळी सात ते साडेसात वाजता विष्णुसहस्त्रनाम, संध्याकाळी आठ ते नऊ वाजता पंचअमृत, दुपारी 11:30 ते 12:30 महानैवद्य व आरती नित्यनेमाने भजनी मंडळ उपस्थित राहून प्रवचन व भावगीत ,भक्तीगीत ,कीर्तन, आभंग ,वाणीशास्त्रीय, संगीत, भरतरम्य,नुपुरनाद, भारुड, सुगम संगीत ,या सारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

           बाहेर गावाहुन आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने केलेली आहे. गुरुवार दिनांक 22 मे रोजी संध्याकाळी आठ वाजता लक्ष्मी नरसिंहाचा छबिना मिरवणूक ही संपूर्ण गावातुन ग्राम प्रदक्षिणा वाजत गाजत हलग्या व फटाक्यांच्या आवाजात देवस्थान ट्रस्टी आणि ग्रामस्थ व भाविकांनी यांनी मिरवणूक काढण्यात आली.

       लक्ष्मी नरसिंहाच्या पादुका पालखी ठेवून वाद्यांच्या गजरात संपूर्ण गाव प्रदक्षिणा घेण्यात आली. लक्ष्मी नरसिंहाच्या पादुका पालखीत ठेवून वाद्यांचा गजरात संपूर्ण गाव प्रदक्षिणा घेण्यात आली.

          सर्वधर्म समभावाने संपूर्ण गावातील ग्रामस्थ व भाविक भक्त देवस्थान ट्रस्ट एकत्रित येऊन आजच्या दिवसाची सेवा पार पाडण्यात आली.

         तर शेवटी दिनांक 13 ते 22 /5/2024 पर्यंत सर्व कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे वेळेत घेण्यात आलेले आहेत. शेवटी 23/5/ 2024 रोजी सकाळी काल्याचे किर्तन ह भ प अंकुश महाराज रणखांबे यांची कीर्तन सेवा ही लक्ष्मी नरसिंह मंदिरात घेण्यात आलेली आहे.

         त्याच दिवशी दुपारी दोन ते संध्याकाळी आठ या वेळेत निकाली कुस्त्याचे जैंगी मैदाना नंतर लक्ष्मी नरसिंहाच्या नवरात्र उत्साहाची सांगता होईल.