युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :-६० वर्षीय मानलेल्या सासऱ्याने १९ वर्षीय विवाहितेवर तीन दिवस जबरी अत्याचार केल्याची घटना खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील लांडी शेत शिवारात राधास्वामी सत्संग जवळ घडली.
घटनेतील फिर्यादीच्या पतीचे व तिच्या मानलेला सासरा व आरोपी चन्नू धाजू तांडीलकर (६०) रा कोकरु ता भैसदही यांचा गुरे चारण्याचा व्यवसाय असुन ३० ते ४० गुरे चारण्याकरीता फिर्यादी पती व आरोपीसह खल्लार जवळील राधा स्वामी सत्संग जवळील लांडी शेतशिवारात आले होते.
घटनेच्या वेळी फिर्यादीचे पती बाहेर गेले असतांना आरोपी चन्नू याने फिर्यादी सोबत जबरदस्ती करीत तीन दिवस शारीरिक सबंध केले याबाबत कुणालाही सांगू नकोस सांगितले तर तुला जिवे मारेन अशी धमकीही दिली.
सदर घटनेची तक्रार फिर्यादीने खल्लार पोलिसांत दिली असून त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी आरोपी चन्नू तांडीलकर विरुध्द कलम ३७६,२(एन),५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे या घटनेचा पुढील तपास खल्लारचे ठाणेदार प्रमोद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली खल्लार पोलिस करीत आहेत.