चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:-
येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने आतंरराष्ट्रीय दुर्मिळ पक्षी दिनाच्या निमित्ताने लाखनी येथील बसस्थानकावरील ‘नेचर पार्क’ वर पक्ष्यांना ग्रीष्माच्या तीव्र दाहकतेतून तहान भागावी म्हणून तीन पक्षी जलकुंड श्रमदानातून तयार केली.त्यात दररोज पाणी भरण्याचे कार्य ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी दररोज करत असुन त्याद्वारे अनेक पक्षी आपली तृष्णा भागवित आहेत.एवढेच नव्हेतर वानर ,मांजर ,छोटे उभयचर प्राणी जसे बेडूक सारखे अनेक प्राणी व मधुरस तयार करणारे मधमाश्या,फुलपाखरे,चतुर किटक इत्यादी सुद्धा या जलकुंडाचा उपयोग करीत आपली तृष्णा भागविण्याचे कार्य करीत आहेत.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने लाखनी बसस्थानकावर तयार केलेल्या ‘नेचर पार्क’ मध्ये सर्वत्र हरियाली तयार झाली असून अनेक प्रवासी वाटसरू उन्हापासून बचाव करण्यासाठी या हिरवाईचा आडोसा घेत असतात.एवढेच नव्हेतर सकाळी हिरव्या झाडीत मानव सेवा मंडळचे सेवानिवृत्त सदस्य नित्यनियमाने योगा तसेच नृत्यव्यायामाद्वारे सकाळचे मनोरंजन व चित्त प्रफुल्लीत करीत असतात.सांजसायंकाळी सुद्धा अनेक सेवानिवृत्त तसेच तरुणाई मंडळी गप्पागोष्टी करण्यासाठी ‘नेचरपार्क’ मध्ये जमा होतात व स्वतःला ताजेतवाने करीत असतात.पक्ष्यांना जलकुंडातील पाणी पक्ष्यांना टिपता यावेत याकरिता पक्षीआसने सुद्धा ग्रीनफ्रेंड्सने तयार केली आहेत.या उपक्रमाला नेफडो जिल्हा शाखा भंडारा, अ.भा. अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले.
याच निमित्ताने पक्षी जलपात्र,पक्षी फिडर बॉटल व पक्षीघरटे बनवा स्पर्धा सुद्धा निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली.पक्षी जलपात्र स्पर्धेत प्रथम क्रमांक मेघा मळकाम हिला तर समिक्षा चौधरीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.पक्षीदाणा बॉटल स्पर्धेत मेघा मळकाम प्रथम तर समिक्षा चौधरीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला तर पक्षी घरटे बनवा स्पर्धेत सृष्टी धांडे हिला प्रथम तर आर्यन धांडे हिला द्वितीय क्रमांक देण्यात आला.पक्षी जलकुंडाकरिता पक्षी आसने बनविण्यासाठी सृष्टी धांडे,आर्यन धांडे,समिक्षा चौधरी, नयना पाखमोडे,यशस्वी कोमेजवार, मेघा मळकाम,अवनी चौधरी, आर्यन धांडे यांनी प्रयत्न केले या सर्वांचे कौतुक करण्यात आले व त्यांना वरील सर्व स्पर्धेचे प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर अवनी चौधरी हिने पक्षी ग्रीटिंग बनवून आणल्याबद्दल तिचे कौतुक सुद्धा करण्यात आले.
या जलकुंड उपक्रमाला लाखनी नगरपंचायत तसेच नगरसेवक संदीप भांडारकर, अशोका बिल्डकाँनचे पर्यवेक्षक अभियंता नितेश नगरकर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक मनोज आगलावे,मुंबई पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर नेताराम मस्के, सेंद्रिय वनौषधी शेतीचे प्रवर्तक इंजि.राजेश गायधनी,गुरुकुल आय.टी.आयचे प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक वैद्य,मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर, मारोतराव कावळे,निसर्गमित्र पंकज भिवगडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.