वसतिगृहातील मारहाण प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई करा :- डॉ.भंते धम्मचेती  – जिल्हाधिकारी व समाजकल्याण आयुक्तांना निवेदन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

    तालुक्यातील बोथली (वहा.) येथील भिवाजी वरभे विद्यालयाच्या अधिनस्त असलेल संत गजानन मुलांचे वसतिगृह आहे. यात चार विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. यात दोषी व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ.भंते धम्मचेती यांनी केली आहे.

        समाज कल्याण विभागामार्फत मान्यता प्राप्त असलेले संत गजानन मुलांचं वसतिगृहात यंदाच्या शैक्षणिक सत्रात चोवीस विद्यार्थी होते. यातील काही विद्यार्थी परीक्षा संपल्याने घरी गेले आहेत. सद्या या ठिकाणी चौदा विद्यार्थी राहत आहेत. यातच मागील गुरुवारला या वसतिगृहाचे चौकीदार साहित्य खरेदी करण्यास बाहेर गेले असता येथील चार विद्यार्थ्यांनी मिळून लोकेश श्रावण भांदककर याला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. 

             या घटनेची माहिती होताच सामाजिक दायित्व समजून डॉ.भंते धम्मचेती यांनी सदर प्रकरणाची माहिती होताच सदर बालकाची भेट घेऊन त्याचे वर उपचार करण्यात आले. त्याच्या वडीलासमवेत शेगाव पोलीस स्टेशन इथे या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. व या वसतिगृहाचे अधीक्षक मागील एक वर्षाच्या काळापासून अपघाताने इथे येत नसल्याची माहिती त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.

        या ठिकाणी सुविधांचा असलेला मोठा अभाव, निव्वळ अनुदान लाटण्यासाठी व्यवस्थापन इथे कार्यरत आहे काय असा प्रश्न उपस्थित केला.

          येथील चौकीदार मुलांना, कापसाचे गट्टे दुव्हारण्यासाठी, माकडांना हाकलण्यासाठी, घर कामासाठी वापर करून घेत असल्याचं खुलासा त्यांनी केला व या सर्व प्रकरणात दोषी असलेले कर्मचारी, अधिकारी व व्यवस्थापन मंडळ यांचेवर कडक कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी, समाजकल्याण आयुक्त व उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली आहे.

             या प्रकरणात जर थातूरमातूर कारवाई करण्याचा प्रकार झाला तर मोठ आंदोलन उभारण्यात येणार असा इशाराही डॉ.भंते धम्मचेती यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम, पीडित मुलगा लोकेश भादककर, पीडित मुलाचे वडील श्रावण भांदककर आदी उपस्थित होते.

    “सदर प्रकरणाची तक्रार स्वीकारण्यात आली असून मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.          

 योगेंद्रसिंह यादव ठाणेदार,
पोलीस स्टेशन शेगाव (बु.)