
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
विधानसभेच्या सभागृहाचे कामकाज अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी असतोय किंवा विधानसभेत उपस्थित केले गेलेल्या मुद्यांना अनुसरून कारवाई संबंधाने असतोय.
माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी वाळूच्या अवैध उत्खननासह अनेक मुद्यांना अनुसरून सभागृहात संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधले आणि संबंधित मंत्र्यांकडून सकारात्मक उत्तर सुध्दा पुढे आले.
मात्र,चिमूर विधानसभा मतदारसंघातील वाळू सारखी महत्त्वपूर्ण खनिज संपदा दिनदहाडे आणि रात्रोच्या वेळी लुटून नेली जात आमदार किर्तीकुमार भांगडीया,”चुप,कसे काय आहेत? हा प्रश्न त्यांच्या बाबतीत अधिकच जनमनात गंभीरता निर्माण करतो आहे.
त्यांचा विधानसभा मतदारसंघातील वाळू सारखी महत्त्वपूर्ण खनिज संपदा दररोज चोरुन नेली जात असताना यावर आमदार किर्तीकुमार भांगडीया हे कधीच बोलले नाही.याचा अर्थ असा की आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना वाळू चोरी मान्य आहे काय?
याचबरोबर वाळू चोरीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांचा स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव आहे की नाही यावर त्यांचे सडेतोड उत्तर त्यांनी सार्वजनिक दिले पाहिजे.
चिमूर तालुक्यातील संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करीत असताना आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची शांत राहणारी भुमिका भ्रष्टाचाराला चालना देणारी आहे असे जनमत बनू नये याची खबरदारी ते केव्हा घेणार? हा प्रश्न सुध्दा गंभीरच दिसतो आहे.
तद्वतच आमदार किर्तीकुमार भांगडीया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा नेतृत्व करीत असताना या क्षेत्रातील युवकांच्या कायम रोजगारा संबंधाने ते आपले योग्य कर्तव्य का म्हणून पार पाडत नाही? हा मुद्दा सुध्दा अधिकच जाटील बनत चालला आहे.
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार अवैध वाळू उत्खनना बाबत विधानसभेच्या अधिवेशनात मुद्दा लावून धरत असतील आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रेटून धरत असतील तर आमदार किर्तीकुमार भांगडीया अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित का म्हणून करीत नाही?
याचबरोबर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी विधानसभेत आता पर्यंत चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या,शेतकऱ्यांच्या,बेरोजगारांच्या,विद्यार्थ्यांच्या,मजूरांच्या,दारिद्र्यात जिवन जगणाऱ्या नागरिकांच्या मुलभूत अधिकारांसंबंधाने व त्यांच्या विकास,सुरक्षा संबंधाने कोण-कोणते मुद्दे लावून धरले याची माहिती ते मतदारांना तारखेसह देतील काय? हेही भिजते घोंगडेच आहे.
अवैध वाळू उत्खनना द्वारे चोरीची मानसिकता अनेकांच्या मनात तयार होणे आणि वाळू चोरी करायला सुरुवात करणे,हा बेरोजगारीचाच मुद्दा आहे.या मुद्द्यावर सुध्दा आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी स्वत: पुढे आले पाहिजे.
मात्र वाळू चोरीचा व्यवसाय नेहमी चालेल असेही नाही,हे लक्षात घेतले तर कर्तृत्ववान तरुणांना आणि तरुणींना परिस्थितीला अनुसरून हा व्यवसाय करण्यास भाग पडणे संयुक्तीक नाही असे वाटते आहे.