ॲड.जयदेव दयाराम मून यांची चिमूर येथे नोटरी करीता नेमणूक… — अधिवक्ता संघाकडून अभिनंदनाचा वर्षाव…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

चिमूर :- तालुक्यातील डोमा परीसरातील चक – जाटेपार येशील शेतकरी, सर्व सामान्य माणसाला अनेक कार्यामध्ये व कामाला सदैव तत्पर असणारे सर्वाचे परीचीत ॲड.जयदेव दयाराम मून यांची नोटरी कायदा, १९५२ (५३) अंतर्गत दिनांक.२० फेब्रुवारी २०२५ ला नोटरी करीता व्यवसाय प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

        हि नियुक्ती पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे या नियुक्तीमुळे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

          तर दिवाणी व फौजदारी न्यायालय चिमूर चे आर.आर सोनडवले बार असोसिएशन तालूका चिमूर अध्यक्ष, अगडे व सर्व अधिवक्ता संघ यांनी ॲड.जयदेव मुन यांचे अभिनंदन केले आहे.