
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
काल दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोज शनिवारला ग्राम विकास विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद चंद्रपूर, पंचायत समिती चिमूर,ग्रामपंचायत शंकरपूर द्वारा आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
विशेष अतिथी म्हणून श्री.डॉक्टर रमेश कुमार गजबे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री अशोक ज्ञानेश्वर चौधरी, प्रमुख पाहुणे श्री. रोशन भाऊ ढोक माजी उपसभापती पंचायत समिती चिमूर, सौ.सविताताई चौधरी ग्रामपंचायत सदस्या, श्री.नितीन भाऊ सावरकर ग्रामपंचायत सदस्य, निखिल भाऊ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, बोडके मॅडम ,श्री केशवजी गजबे ग्रामपंचायत अधिकारी, शंकरपूर येथील घरकुल लाभार्थी व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन बोडके मॅडम यांनी केले.