मूलचे पत्रकार आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे,ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा पुरस्काराने होणार आज सन्मानित!..

       रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

    जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या समारोप समारंभात,दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथे ग्राहक चळवळीतील ५ आघाडीच्या कार्यकर्त्यांना ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा*पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

      यात विविध क्षेत्रातील खालील मान्यवरांच्या समावेश आहे.

१).दीपक देशपांडे,ता.मूल, जि.चंद्रपूर

२).शिवाजी काळे,ता.जुन्नर

 ३).सौ.दुर्गाताई शुक्रे,पुणे

 ४).सौ श्रद्धा शिंदे,इस्लामपूर

*****

       तसेच राज्य कार्यकरिणी विशेष सन्मान – सौ शैला शिळीमकर,पुणे यांचा होणार आहे.

      यावेळी निबंध लेखन उपक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचा बक्षीस वितरण व यथोचित सन्मान करण्यात येईल.

    सरकारी अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय प्रतिनिधी पुणे,सातारा व सांगली यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.