मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहार येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

   चिमूर तालुकातंर्गत मौजा मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

        संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला बहिणा बांबोडे,दुर्योधन गजभिये,प्रफुल्ल वरखडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

        प्रदिप मेश्राम,यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला गाडगे महाराज हे अनिष्ट रूढी आणि परंपरेवर जोरदार पहार करत होते कीर्तनाच्या माध्यमातुन त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचे काम केले गाडगेमहाराज यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली.

   गाडगे महाराजांमध्ये गोरगरीब दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळ होती.

       लोकांमधील अंधश्रद्धा आणि गरिबी दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व त्यांना माहित होते.प्रसंगी घरातील वस्तू विका  पण आपल्या पाल्यांना शिकवा असे ते नेहमी सांगायचे.

      अशा शब्दात मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केल.

         याप्रसंगी पंकज रामटेके,रोशन‌ बोरकर,सत्यफुला चव्हाण,शंकुतला मेश्राम,मिलन मेश्राम,आदीं मान्यवर व शालेय  विद्यार्थी,गावातील नागरिक उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले.आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.