युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
गौरखेडा येथील मिलिंद विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दीपक कावरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील शिक्षक अमितकुमार वानखडे, मनीषा गावंडे मॅडम, संजय आठवले हे उपस्थित होते.
सर्व प्रथम संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यालयातील पाच ते दहा च्या वर्गात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांच्या जीवनावर भाषणे दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग दहावीची विद्यार्थिनी राशी वंजारी व संचालन आणि आभार प्रदर्शन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कुमारी मनीषा इंगळे हिने केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी संजयआठवले ,आनंद खंडारे, पियुष वंजारी , अक्षय वानखडे , भावेश कडू, लकी इंगळे ,शुभांगी खंडारे ,आफ्रीन पठाण ,तनवी खंडारे, वैष्णवी सोळंके ,ईश्वरी सोळंके ,ईश्वरी मोपारी, ऋषिकेश चव्हाण, तेजस्विनी वर्धे , होमेरा शेख , भूमी इंगळे , कोमल इंगळे , दीक्षा इंगळे ,नव्या खंडारे, मानव चक्रे ,कृष्णा रहाटे ,आर्यन सदाशिव ,प्राची गवई ,सोहम वानखडे ,मनीषा मालवे ,आराध्या खंडारे ,रुचिका गवई ,अब्बास पठाण ,श्रेया मोपारी, भूमिका सगणे , प्राची वंजारी ,लकी खंडारे यांनी अथक घेतले.