डॉ.सातिश वारजूकरांनी पदाधिकाऱ्यांसह मृतक आकाश सोनटक्के यांच्या परिवाराची घेतली भेट.. — अवैध रेती उत्खननातंर्गत मृत्यू..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका 

         जंगल परिसरातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता.

        ही घटना गुरूवार,21 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास मुरपार-पिट्टीचुआ मार्गावर घडली होती.आकाश सोनटक्के (रा. नवेगाव, रामदेगी) असे मृतकाचे नाव आहे.

        तालुक्यात रेती तस्करांची मुजोरी वाढली असून,मोठ्या प्रमाणात गावानजीक तथा जंगल क्षेत्रातील नदी नाल्यातून रेती तस्करी केल्या जात आहे.

 मृतक आकाश सोनटक्के यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना डॉ.सतीष वारजूकर..

       मुरपार-पिट्टीचुआ मार्गावरून खडसंगी येथे येणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रालीवर मृतक चालकाच्या बाजुला बसून होता.

         अवैध रेती वाहतुकीच्या जादा फेऱ्या करण्याच्या नादात ट्रॅक्टर भरधाव चालवित असताना अचानक आकाश ट्रॅक्टरवरून खाली पडला आणि चाकात आल्याने त्याचा मृत्यू झाला.

            मृतक हा लकवाग्रस्त वडील व आईचा एकुलता एक आधार होता.आकाशच्या मृत्युने त्यांच्यावर दुखःचे आभाळ कोसळले आहे. 

         आज राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांनी परिवाराची सांत्वनपर भेट घेतली व आर्थिक मदत दिली.

          यावेळी सरचिटणीस चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी गजानन बुटके,युवक कांग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा रोशन ढोक,ग्रामपंचायत सदस्य रंजना नन्नावरे,सचिन सोनटक्के,अंनता धुर्वे,गुणवंता धूर्वे,राकेश सोनटक्के, कल्याणी सोनटक्के, दिक्षा धुर्वे,उपस्थित होते.