वाशिम प्रतिनिधी/ आशिष धोंगडे
वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.२३/०२/२०२३ रोजी महात्मा फुले अनुभव कट्टा हिंगणवाडी येथील युवकांनी एकत्र येऊन संत गाडगे महाराज यांची जयंती अनोख्या उपक्रमातून साजरी करण्यात आली.
त्यामध्ये संपूर्ण गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवून गावाची स्वच्छता करण्यात आली. व स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यामध्ये स्वच्छता अभियान रॅलीच्या माध्यमातून घोषणा देऊन नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न अनुभव कट्टा यांनी केला.या कार्यक्रमाचे आयोजन आकाश राऊत,विद्रोहि मंगेश,सागर राऊत,अक्षय राऊत,ऋषिकेश राऊत, संमेग शिरसाट,पवन गवई,नितीन मोखळकर,गावामधुन् या युवकांनी पुढाकार घेऊन संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली…..
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्यूज भारत