
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- तालुक्यातील मौजा काटली येथील ग्रामसेवक यांची प्रशासकीय कारकीर्द अत्यंत बेजबाबदार असून ते आपल्या पदाच्या कार्यात हयगय करत असतात. अनेकदा ते आपल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाही.
त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे ते देत असतात. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत मध्ये हिशोबाची सहामाही ग्रामसभेला ते उपस्थित राहत नव्हते तसेच मासिक सभेला सुद्धा उपस्थित नव्हते.
सदर बाब गंभीर असून जनतेसह हि प्रशासनाची सुद्धा दिशाभूल आहे असा आरोप करत ग्रामसेवकास चौकशी करून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली.
अनेकदा कार्यालयीन वेळेत ते नशेत असल्याचे सुद्धा असतात. त्याच प्रमाणे आमच्या कार्यकत्यांनी काही महत्वाची माहिती मागितली असता त्यांनी माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन सुद्धा केले. असे ही निवेदनात म्हटलं आहे.
सदर प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून सदर ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे असे निवेदन जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, काटली ग्रामपंचायत सदस्य देवा भोयर, रेवनात मेश्राम यांनी केली.