अॅड. मधुकर लांबट यांची नोटरी पदी नियुक्ती…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

           केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरिता चिमुर येथील अॅड. मधुकर झ्यामराव लांबट यांची नुकतीच नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली.

            अॅड. लांबट हे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वरोरा व दिवाणी व फौजदारी न्यायालय चिमुर येथील न्यायालयात मागील ४३ वर्षापासुन वकीली व्यवसाय करीत असुन ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. अॅड. लांबट यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र स्वागत होत आहे.