आमदार रामदास मसराम यांनी जखमी हरणीच्या पिल्लाला दिला जीवदान…

 राजेंद्र रामटेके 

  विशेष प्रतिनिधी 

           गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा ते वडसा मार्गावर कसारी फाट्याजवळ आमदार रामदास मसराम यांच्या दौऱ्यादरम्यान माणुसकीचा आदर्श घडवणारी घटना घडली.

        दौऱ्यावर असताना त्यांना रस्त्यावर एक हरणीचे पिल्लू जखमी अवस्थेत पडलेले आढळले.

          तात्काळ निर्णय घेत, त्यांनी त्या पिल्लाला स्वतःच्या गाडीत मांडून जवळच्या म्हणजे देसाईगंज येथिल पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. त्यांनी डॉक्टरांना उपचारासाठी सूचना देत योग्य ती काळजी घेण्यास सांगितले.

          आमदार मसराम यांच्या या तात्काळ व संवेदनशील कृतीमुळे हरणीच्या पिल्लाचे प्राण वाचले. त्यांच्या या कृतीचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे व हा माणुसकीचा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.