नंदू (नरेंद्र) पढाल महाराष्ट्र भोईराज रत्न समाज पुरस्काराने सन्मानित…   

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

भद्रावती दि.23 :-  18 व 19 जानेवारी 2025 ला तिरुपती आंध्र प्रदेश येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था यांच्या माध्यमातून भारतातील संपूर्ण भोई समाजाचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.

        या अधिवेशनात उद्घाटक म्हणून राजस्थान राज्याचे राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे उपस्थित होते.

          या अधिवेशनात भोई समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक, रोजगार संबंधातील व राजकीय विषयांवर मंथन करून दिशा ठरवण्यात आली.

          या राष्ट्रीय अधिवेशनात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाज बांधव आणि भगिनींना पुरस्कार सुद्धा देण्यात आले.

         त्यातच श्री नंदू ( नरेंद्र) पढाल नगरसेवक तथा शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याची तसेच त्यांची भोई समाजाबद्दल असलेल्या प्रेम, निष्ठा व कार्याची दखल घेत आचार्य श्री. गोविंद ब्रह्मगिरी महाराज यांच्या उपस्थितीत आणि संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री एकनाथजी काटकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री प्रेमजी भाई मेहरा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री सुपडूभाऊ खेडेकर, राष्ट्रीय महासचिव श्री गजानन दादा साटोटे, निवृत्त न्यायाधीश श्री चंद्रलाल मेश्राम, संयोजक श्री नानासाहेब लकारे, विदर्भ महिला अध्यक्ष अल्का ताई पचारे यांच्या हस्ते हा महाराष्ट्र भोईराज रत्न समाज पुरस्कार देऊन नंदू पढाल नगरसेवक भद्रावती यांना गौरवण्यात आल.

           या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील विविध राज्यातून समाजाचे प्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी व असंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.