कंत्राटी शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया थांबविण्यासाठी गडचिरोलीच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन…

ऋषी सहारे 

  संपादक 

          गडचिरोली जिल्ह्य़ात माहे सप्टेंबर मध्ये पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती मानधन तत्वावर करण्यात आली आहे.

      त्याना आता ४ महिने पूर्ण झाले असुन काही कंत्राटी शिक्षकाचे २ महीण्याचे मानधन झाले.पण काही शिक्षकाचे रुजू झाल्यापासून अद्याप मानधन देण्यात आलेले नाही,त्यामुळे पेसा अंतर्गत अती दुर्गम भागात काम करणा-या कंत्राटी शिक्षकांना कौटुंबिक समस्येला सामोरे जावे लागत असुन उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

             हे सगळ असताना तुम्ही बदलीचे सत्र चालवले आहे. ते नक्कीच आम्हाला न परवडणारे आहे.यामुळे कंत्राटी शिक्षकांची समायोजन प्रक्रिया तात्पुरती थांबविण्याबाबत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

        पेसा अंतर्गत स्थानिक पातळीवर कंत्राटी शिक्षक भरती करण्यात आली असली तरी अनेकांना अतिदुर्गम भागात खुप लांबच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. 

          तुटपुंज्या मानधनात येणेजाणेचा खर्च न परवडणारा असल्याने अनेक कंत्राटी शिक्षक परीवारापासुन दुर भाड्याच्या खोलीत राहत आहेत व दुर्गम भागात सेवा देण्याच काम निसंकोच पार पाडत आहेत. 

             पण काही शिक्षकाचे मानधनच न मिळाल्याने त्याचे घर भाडे थकले आहेत आणि आता समायोजन म्हणजे परत बदली करावी लागत असल्याने जुने थकलेले घरभाडे द्यायचे कसे? खायचे काय? शिवाय कायम शिक्षकाना ज्या शासकिय सवलती देण्यात येतात त्या सवलती कंत्राटी शिक्षकास लागु नाहीत.

        तद्वतच ज्या जिआर नुसार भरती घेण्यात आली त्या जिआर च मानधन मिळत नाही तर २० हजार वरुन १५ हजार केले. पण तेही वेळेवर देण्यात आलेल नाही आणि बदली प्रकरण मात्र थांबत नाही. 

          असे असताना कंत्राटी शिक्षकानी कुठल्या मानसिकतेत राहुन मुलाना विद्यार्जन करावे. असे अनेक अनुत्तरीत सवाल कंत्राटी शिक्षकासमोर उपस्थित होत आहेत. 

      तरी सदर गंभीर बाब लक्षात घेऊन स्थानिक जिल्हा प्रशासनाने संबधीत विभागाकडे पाठपुरावा करुन पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकाची समायोजन प्रक्रिया चालु सत्र संपेपर्यंत थांबविण्यात यावी.

        नविन सत्रात समुपदेशन करावे,सोबतच उर्वरित मानधन तातडीन देण्यात यावे.याबाबत गडचिरोली जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कंत्राटी शिक्षकांद्वारे निवेदन देण्यात येत आहे.

     सदर निवेदनाच्या प्रतीलिपी,१. मा. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य,२. मा. शिक्षणमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य,३. आदिवासी विकासमंत्री महाराष्ट्र राज्य,४.मा.जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली,५.मा. शिक्षणाधिकारी साहेब जि. प. गडचिरोली यांना पाठविण्यात आले आहे.