ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके 23 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव.
स.10.30 वा. स्थानिक लोकप्रतिनिधी, आदिवासी विद्यार्थी संघटना, वसतीगृहातील मुले/मुली व प्रतिनिधी यांचेसाठी राखीव.
दु. 11 वा आदिवासी विकास विभागातील लाभार्थ्यांशी संवाद मेळाव्यास शासकीय माध्यमीक कन्या आश्रमशाळा सोडे ता.धानोरा येथे उपस्थिती.
दुपारी 2.30 वा. आरमोरी येथे गोटुल महोत्सव व सांस्कृतिक कला, क्रीडा स्पर्धा, आदिवासी समाज प्रबोधन मार्गदर्शन शिबीरास उपस्थिती.
सायंकाळी 4 वाजता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास, शबरी विकास महामंडळाचा आढावा.
सायंकाळी 5.30 वा. पत्रकार परिषद. सायं. 6 वा. आदिवासी विभागाच्या विविध संस्था व मुलींचे वसतीगृहास भेटी. रात्री 8 वा. यवतमाळकडे प्रयाण.