प्रवाश्यांना चिरडणाऱ्या व्यवस्थेवर सदोष मन्युष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- बसप नेते डॉ.हुलगेश चलवादी यांची मागणी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

           वृत्त संपादिका 

दिनांक २३ जानेवारी २०२५, पुणे

          महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या जळगाव येथील पाचोरा जवळ घडलेल्या दुदैवी घटनेत जवळपास ११ प्रवाशांचा मृत्यू झाला.ही घटना अत्यंद दु:खद तसेच मन हेलावून सोडणारी आहे.घटनेची सखोल चौकशी करीत प्रवाश्यांना चिरडणाऱ्या व्यवस्थेवर सदोष मन्युष्यवधाचा गुन्हा दाखल करा,अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरूवारी (ता.२३) केली.मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत देवू करावी, अशी मागणी देखील डॉ.चलवादी यांनी केली आहे.

          मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातला. पंरतु, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या समन्वय यंत्रणेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी यासंपूर्ण घटनाक्रमावर स्पष्टोक्ती द्यावी तसेच उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करीत दोषींवर कडक कारवाईची मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.

          स्थानिकांनी देखील रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाअभावी एवढी मोठी घटना घडल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर रेल्वेने यावर तत्काळ स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

         पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याच्या अफवेने अचानक ‘चैन पुलिंग’ करण्यात आल्याचे बोलले जात आहे. एक्सप्रेस मध्ये खरंच आग लागली होती का? आग लागली असेल तर त्याचे कारण काय? आग लागली नसेल तर अशी अफवा कुणी पसरवली? या दिशेने देखील सखोल तपासाची आवश्यकता आहे.

           प्रत्यक्षदर्शींनूसार कर्नाटक एक्सप्रेसचा हॉर्न वाजला नाही.असे असेल तर संबंधित लोको पायलट तसेच स्टेशन वरून संबंधितांना पुष्पक एक्सप्रेस संबंधी माहिती न देणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ.चलवादींनी केली. रेल्वेचा हॉर्न वाजला असता आणि स्टेशनवरून योग्य समन्वय झाले असते तर दुदैवी घटना टाळता आली असती, असे मत देखील डॉ.चलवादींनी व्यक्त केले.