विद्रोही संमेलन छत्रपती संभाजी नगरात…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

       संविधान मूल्यांना समर्पित विद्रोही साहित्य संमेलन हे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात होणार आहे. 

      संमेलनाचे अध्यक्ष,स्वागताध्यक्ष,कार्यक्रम पत्रिका व इतर महत्वाच्या बाबी लवकरच जाहीर होणार आहे,अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी यांनी शुक्रवारी (१० जानेवारी) पत्रकार परिषदेत दिली. 

       या वेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकारी संघटक किशोर ढमाले,प्रा.रामप्रसाद तौर,के.ई.हरदास,प्रा.भारत शिरसाठ,डॉ.प्रतिभा अहिरे,चित्रकार राजानंद सुरडकर,अनंत भवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

       प्रा.परदेशी म्हणाल्या,’विद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९ पासून राज्यभर कार्यरत आहे.महात्मा फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहींचा वैचारिक पाया आहे.न्या.म.गो.रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण महात्मा

अ. भा. साहित्य संमेलनाकडे पाठ

           अलीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनातून चक्क चंगळवादी संस्कृती जोपासली जात आहे. या साहित्य संमेलनात ना साहित्य आहे ना संस्कृती आहे. संमेलातील भोजनावळींवर चर्चा होते आणि जनतेच्या कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा या संमेलनात होत आहे. एवढे करुनही अखिल भारतीय साहित्य संमेलन ओस पडत आहे, तर विद्रोही विद्रोही संमेलन छत्रपती संभाजीनगरात.

म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

          संविधान मूल्यांना समर्पित विद्रोही साहित्य संमेलन हे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यक्रम पत्रिका व इतर महत्वाच्या बाबी लवकरच जाहीर होणार आहे, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी शुक्रवारी (१० जानेवारी) पत्रकार परिषदेत दिली.

          या वेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकारी संघटक किशोर ढमाले, प्रा. रामप्रसाद तौर, के. ई. हरदास प्रा. भारत शिरसाठ, डॉ. प्रतिभा अहिरे, चित्रकार राजानंद सुरडकर, अनंत भवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. परदेशी म्हणाल्या, ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९ पासून राज्यभर कार्यरत आहे. महात्मा फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहींचा वैचारिक पाया आहे. न्या. म. गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण महात्मा फुले यांना दिले.

      ब्राह्मणी,भांडवली,पुरुषसत्ताक मूल्य आणि विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणाऱ्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-आंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटित कृती केली पाहिजे,याच भूमिकेतून विविध जिल्ह्यांत आजवर १८ संमेलने घेण्यात आली.

        चिपळूणच्या साहित्य संमेलनात परशुरामाची मूर्ती स्टेजवर ठेवण्याचा आग्रह,ठाण्यात संमेलन स्मरणिकेत महात्मा गांधी यांच्या हत्याराचा ‘पंडित नथुराम’ असा उल्लेख करणे,संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी शाहीर अण्णा भाऊ साठे, शा.गव्हाणकर,शा.अमर शेख,शा.वामनदादा कर्डक,क्रांतीसिंह नाना पाटील,भाई उद्धवराव पाटील,कर्मवीर दादासाहेब गायकवाड,शा.यशवंत चकोर यांना निमंत्रणही न देणे,नयनतारा सहेगल यांना यवतमाळला उद्घाटक म्हणून बोलावून नंतर अपमानित करणे,अशी विषमतावादाची उदाहरणे आहेत,याकडे प्रा.परदेशी यांनी लक्ष वेधले. 

      सरळसरळ बहुजनांनी अ. भा.साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे उघड झाले आहे, याकडेही पत्रकार परिषदेत लक्ष वेधण्यात आले.