
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी चंद्रपूर पर्पल उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यात विविध कला व सांस्कृतीक कार्यक्रम प्रस्तुत केले जाणार आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या दिव्यांग धोरण अंतर्गत दिव्यांग कौशल विकास मल्टीपर्पज सोसायटी व पुनम प्रॉडक्शन यांच्या साहाय्याने दिव्यांग बांधवांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी गणतंत्र दिनानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन २४ जानेवारी रोजी प्रियदर्शिनी सभागृह येथे १२ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.
दिव्यांग बांधव हा समाजातील महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. दिव्यांग बांधवांच्या सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे योजना आणल्या गेल्या आहेत व त्या महानगरपालिका स्तरावर चंद्रपूर मनपाद्वारे राबविल्या जात आहेत.
शारीरिक विकलांगतेमुळे दिव्यांग बांधवांच्या कलागुणांना पुरेसा वाव मिळत नाही, हे लक्षात घेऊन मनपाद्वारे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमास उदघाटक म्हणुन पालकमंत्री डॉ.अशोक उईके तर अध्यक्ष म्हणुन खासदार प्रतिभा धानोरकर,आमदार किशोर जोरगेवार उपस्थीत राहणार आहेत.
या कार्यक्रमात दिव्यांग बांधव गाणे, समुह गाणे, नृत्य,समुह नृत्य, रॅम्प वॉक सारखे कौशल्य स्वतः प्रस्तुत करणार आहेत. कार्यक्रम प्रसंगी भोजन व इतर व्यवस्था करण्यात आली असुन यात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थीत राहणार आहेत..