जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी मौजा लक्ष्मणपुर ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे रात्रौ “इथेच संपला माणूस” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर घाणाघाती टीका केली. अच्छे दिनाचे आश्वासना बद्धल बोलतांना ते पुढे म्हणाले कि, अच्छे दिन आणण्यासाठी शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट दर देऊ, विदेशी बँकातून काळाधन आणू व प्रत्येकांच्या खात्यात 15-15 लाख रुपये जमा करू, वर्षाला 2 कोटी रोजगार, नोकऱ्या देऊ अशी खोटी आश्वासनं देऊन सत्तेत आल्यावर एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही.
या उलट महागाई,बेरोजगारी मोठ्याप्रमाणावर वाढली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, लागवडीचा खर्च मात्र वाढला.
काळा धन ही आला नाही व 15 लाख ही जमा झाले नाही. मोदी सरकारने सार्वजनिक 2 कोटी रोजगार तर सोडाच रोजगार गमावण्याची वेळ आली. अच्छे दिन येण्याऐवजी कधी नव्हे तेवढे वाईट दिवस आले.
याप्रसंगी नाट्यप्रयोगाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, दिलीप पाटील गौरकर, विजनजी सरकार, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भाऊ भगत यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य रूपालीताई निखाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई भगत, सोमनपली सरपंच निळकंठ पाटील निखाडे, पवन महाराज, मुकेश भाऊ निखाडे, रमेश भाऊ कोडापे, किशोर भाऊ खामनकर, पोलीस पाटील सुरेश पाटील चोखारे, मनिंदर जी बॅनर्जी, दादाजी पाटील निखाडे, विनायक जी वाढीवा, सुरेश पाटील ढुमणे व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.