शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर येथील बस स्थानक 2024 मध्ये पूर्ण होऊन करोडो रुपये यावर खर्च झाले.मात्र, प्रवाशाना पिण्याचे पाणी मिळत नाही,नळाची व्यवस्था नाही,बस स्थानक परिसरात बस उभी राहण्याचे ठिकाणी पेव्हर ब्लॅक बसवलेले नाही.बस येणे जाणेचे रस्ते सिमेंटचे किंवा डांबरचे बनविले नाहीत.
बसमुळे होणारा धूळ संपूर्ण प्रवाशाचे अंगावर येतोय,यामुळे बस स्थानक परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
कंत्राटदाराने रस्ता व्यवस्थित बनविला नाही.त्यामुळे मोठमोठे गड्डे पडलेले असून ड्रायव्हर, कंडक्टर व प्रवासी जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत.
बस स्थानकाचे दोन्ही गेट समोरून बस चालकास एसटी बस चालवीतांना अतिक्रमनचा सामना करावा लागतो.बस स्थानकातील फ्लॅट क्र. 5,6,7 चे ठिकाणी प्रवाश्यांना बाण्यासाठी खुर्च्या नाहीत.त्यामुळे तासंतास बसची वाट पाहत उभे ताटकळत राहावे लागत आहे.
कंत्राटदाराने जुन्या होत्या त्या खुर्च्या लावल्या आहेत.नवीन एकही खुर्ची लावलेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे यांनी केली आहे.